पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) राज्यात धोरणाचा विस्फोट झाला असून आज कोरोना बाधित रुग्णांची संख्या अठरा हजार ४६६ वर पोहोचली आहे ही गेल्या चार दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून एक डिसेंबर रोजी राज्यात नऊ हजार १७० रुग्णांची भर पडली होती त्यात सातत्याने वाढ होत असून आज तब्बल १८ हजाराचा टप्पा ओलांडलेला आहे यात एकट्या मुंबईची एका दिवसात १० हजार ८६० एवढी आहे त्यामुळे राज्य शासन कडक निर्बंध घालण्याच्या मनस्थितीत आहे.
मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच विना मास फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असून मास्क न घालणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपयांचा दंड तर रस्त्यावर थुंंकणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.तसे आदेश पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त व दोन्ही महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुणे जिल्ह्यात लसीकरण झालेल्यांना प्रवेश दिला जाईल तर कार्यालयातही हा नियम लागू असणार आहे, तसेच राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन उद्या महत्वाची बैठक घेऊन त्यात ठोस उपाययोजना संदर्भात चर्चा होईल व अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असे अजित पवार यांनी सांगितले.
मुंबईत आज जवळपास ५० हजार चाचण्या करण्यात आल्या तर कोरोना रुग्ण १० हजाराच्या वर आढळून आले त्यामुळे ही बाधित रुग्ण २५ टक्क्यांवर पोहोचली आहे तसेच पुण्याची १८ टक्के इतकी आहे
