पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) शिवडी न्हावाशेवा या समुद्रसेतुवरील पहिला पोलादी गाळा बसवण्याचे काम नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पार पडले, हा देशातील अतिशय महत्त्वाकांक्षी व पहिला असा समुद्रसेतु असून याची लांबी बावीस किलोमीटर इतकी आहे.
यासाठी लागणारे लोखंडी गाळे तयार करण्याचे काम जपान, दक्षिण कोरिया, व्हीयतनाम, तैवान, म्यानमार या देशात करण्यात येत आहेत, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याने याची कार्यक्षमता अधिक असणार आहे
एम एम आर डी च्या माध्यमातून या समुद्रसेतुची निर्मिती केली जात असून जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या साठी केला जात आहे या समुद्रसेतु साठी 70 लोखंडी गर्डल (पट्ट्या) लागणार असून यातील पहिला पोलादी गाळा आज बसविण्यात आला.देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ वाचणार आहे, जे अंतर कापण्यासाठी अडीच तासाचा कालावधी लागत होता त्यासाठी केवळ वीस मिनिटात हे अंतर पूर्ण केले जाऊ शकणार आहे, यामुळे मुंबई रायगड यातील अंतर कमी झालेले आहे हा सहा पदरी मार्ग असणार आहे यावेळी एम एम आर डी ए चे आयुक्त एच डी आर श्रीनिवास राजन विचारे हे देखील उपस्थित होते.
हा प्रकल्प पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे
