पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  सेव द चिल्डरण या नावाप्रमाणे सामाजिक कामात कार्यरत असलेली स्वयंसेवी संस्था एन जी ओ यांच्या कडून लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सहकार्य करण्याचे काम केले जाते, याचाच एक भाग म्हणजे हवेलीतील ५० प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील मुलांना दप्तरे,विविध गोष्टींची पुस्तके,अत्यंत उपयुक्त साकार स्वाध्याय पुस्तिका, एक मोठा दूरचित्रवाणी संच व शाळेच्या बोलक्या भिंती अर्थातच भिंतीची रंगरंगोटी अशी कामे केली गेली.

            या सेवाभावी संस्थेने गेल्या वर्षभरात म्हणजे जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालखंडात हवेलीतील ग्रामीण भागातील शाळामध्ये ही कामे केली विशेषतः हा कोरोनाचा कालखंड याच दरम्यान अध्ययनाचे काम बंद असताना या शाळेच्या भिंती रंगवून त्या बोलक्या केल्या कारण कोरोना आटोक्यात आल्यानंतर हे बालचमू शाळेत आल्यावर त्यांचे स्वागत या उल्हासित वातावरणात व्हायला हवे हीच या मागची संकल्पना, गेल्या काहीच दिवसांपूर्वी ही लहानगी मंडळी शाळेकडे वळली, तब्बल दीड वर्षांनंतर शाळेत आल्यानंतर झालेलं स्वागत हे त्यांचा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
            वर्षाचा शेवटचा दिवस त्याचप्रमाणे या संस्थेच्या कामाचाही  आज निरोप देण्याचा दिवस त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या कामाचे थोडे उतराई होण्यासाठी तारमळा प्राथमिक शाळेत एक छोटासा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी या संस्थेचे समन्वयक हरीश राठोड हे सपत्नीक उपस्थित होते तसेच केंद्रप्रमुख महेंद्रकुमार मोरे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा थेऊरचे शिक्षक रेहमान मकबूल शेख, सचिन सुभाष कोलते, संतोष सुधाकर कोष्टी, संजय निवृत्ती आगलावे तारमळा शाळेच्या मुख्याध्यापिका जयमाला संगमेश हिरेमठ, विद्याराणी नामदेव कुदळे,रमेश जगताप व सरिता परदेशी यांनी केले होते.
            यावेळी समन्वयक राठोड यांनी संस्थेसंबंधी माहिती दिली तर केंद्रप्रमुख मोरे यांनी या संस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *