थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नारायण राणे च्या पॅनेलचे वर्चस्व अबाधित राहिले असून जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोजणी अंती समोर आलेल्या निकालानुसार भाजप प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनल ने ११ जागा जिंकल्या असून महा विकास आघाडी पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनेलला आठ जागा मिळालेल्या आहेत यामुळे गेली काही दिवसापासून संपूर्ण राज्यात त्या जिल्हा बँकेचे संदर्भात उत्सुकता लागली होती या निवडणुकी दरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला क्या हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले असून जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे त्यानंतर भाजप व महाविकासआघाडी यांच्या नेत्यांमध्ये या प्रकरणावरून जोरदार खडाजंगी झाली मात्र भाजपने या निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे
सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघांमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर विजयी झाले त्यांनी महा विकास आघाडीच्या सुरेश दळवी यांचा पराभव केला सहकारी संस्था नागरी पतपुरवठा संस्था पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाला या ठिकाणी महा विकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी झाले सुशांत नाईक आमदार वैभव नाईक यांचे भाऊ असल्याने याठिकाणी भाजपला धक्का बसला आहे तर कणकवली मधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली त्यामुळे चिठ्ठीद्वारे हा निकाल घेण्यात आला यात सतीश सावंत पराभूत झाले सतीश सावंत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष होते औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था या मतदारसंघातून भाजपचे गजानन गावडे विजयी झाले त्यांनी महा विकास आघाडीच्या लक्ष्मण आंगणे यांचा पराभव केला विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून महा विकास आघाडीचे मेगनाथ धुरी विजयी झाले त्यांनी भाजपच्या गुलाबराव चव्हाण यांचा पराभव केला यांचा पराभव केला
