पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) नववर्षाच्या सुरुवातीला राज्यातील पर्यटन स्थळी प्रचंड गर्दी झाली आहे तर तीर्थक्षेत्रे मात्र ओसंडून वाहताना दिसत आहेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागलेली असताना देखील हे भाविक कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीत यामुळे येणाऱ्या काही दिवसात याचे दुष्परिणाम निश्चितच जाणवतील अशी भीती व्यक्त केली जात आहे राज्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र, जेजुरी, आळंदी, शिर्डी त्याचप्रमाणे पंढरपूर अशा तीर्थक्षेत्री नववर्षाच्या पहिल्या दिवशी देव दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली दिसत आहे लांबच लांब रांगा दिसून येत आहे परंतु त्यांच्यात सामाजिक आंतर मात्र पाहताना दिसून येत नाही अनेक जणांच्या तोंडावर मुखपट्टी सुद्धा नाही गेल्या चार दिवसात राज्यातील वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता येत्या काही दिवसात या गर्दीतून काही वेगळेच निकाल बाहेर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने या नियमाचे कठोर पालन केले तर आपणही लाट रोखू शकू केवळ शासकीय पातळीवर निर्बंध घालून याला रोखणे अवघड होईल त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी  काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा शासनाला कठोर निर्णय घेऊन कदाचित लॉकडाऊन चा सुद्धा निर्णय घ्यावा लागेल अशी परिस्थिती उद्भवू शकते.

        पुणे शहरापासून जवळच असलेल्या थेऊर या अष्टविनायकापैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्री आज सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे त्यामुळे येथील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसते, येथे स्थानिक व्यापारी  फळे, भाज्या विक्रीसाठी गर्दी करतात तर मंदिर परिसरात भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असून कोरोना नियमांच्या कडे दुर्लक्ष होताना दिसते सध्याची परिस्थिती पाहता कोरोना नियम काटेकोर पणे पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे अन्यथा मागचा अनुभव पाहता याची मोठी किंमत मोजावी लागेल शासनाने काही निर्बंध घातलेले असले तरी आणखी धार्मिक स्थळांच्या बाबतीत कोणतीही नियमावली जाहीर केलेली नाही मागील दोन लाटेचा अनुभव पाहता बहुतेक गर्दीही धार्मिक स्थळी होताना दिसते त्यामुळे लवकरच यावरही निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *