थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीड येथील शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती असा पायी प्रवास करण्याचा संकल्प करून तिरुपती बालाजी दर्शनासाठी निघाले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले होते त्यांना शिवसेनेच्या वतीने मदतीचा ओघ सुरू झाला असून औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पाच लाख रुपये मदत केल्यानंतर शिवसेनेचे नेते नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे  यांनी पाच लाख रुपये मदत पाठवली असून त्यांचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांनी ती रक्कम रुईकर यांच्या पत्नीकडे सुपूर्त केली

          सुमंत रुईकर यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी या अगोदर देखील बीड ते तिरुपती बालाजी असा पायी प्रवास केला होता मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला होता दरम्यान मागील काही दिवसात मुख्यमंत्री आजारी पडले त्यांना दीर्घायुष्य लाभावे, आरोग्य लाभावं यासाठी सुमंत रुईकर यांनी पुन्हा बीड ते तिरुपती असा पायी प्रवास करण्याचे संकल्प करून बीड पासुन तिरुपती कडे पायी प्रवासाला निघाले दरम्यान रस्त्यातच त्यांना ताप आला व रुग्णालयात त्यांचे निधन झाले तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती परंतु त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले अशा वेळी त्यांना शिवसेनेकडुन मदतीची अपेक्षा होती शिवसेना देखील त्यांच्या मदतीला धावली नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच गोरगरीब, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना धावून जातात मग तो शिवसैनिक असो वा सर्वसामान्य नागरिक त्यांचे मदतीचे कार्य मोठे असून कोणीही त्यांच्याकडे गेला तर विमुख परतत नाही मग ते आरोग्यविषयक काम असो अथवा आर्थिक मदतीचे त्यांच्याकडून नेहमीच मदत होत असते सुमंत रुईकर के सच्चे सैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोग्यासाठी व दीर्घायु आयुष्यासाठी त्यांनी आपले प्राण गमावले त्यामुळे शिवसेना ही सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील असे सांगून त्यांच्या कुटुंबियांसाठी लवकरच घर बांधणी करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले तर त्यांच्या पत्नी यांना देखील कसलीही उणीव भासू देणार नाही असे आश्वासन दिले शिवसेना ही त्यांच्या पाठीशी कायम उभी राहिल असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *