थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  कुंजीरवाडी ग्रामपंचायत व श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने थेऊरफाटा, कुंजीरवाडी येथे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “शरद कृषी प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन यशवंत चे माजी उपाध्यक्ष हवेलीचे ज्येष्ठ नेते माधवराव काळभोर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रतापराव गायकवाड,माजी संचालक पांडुरंग काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हवेलीचे सभापती अनिल टिळेकर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर,माजी संचालक महादेव धुमाळ, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, माजी सदस्य हिरामण काकडे, गुलाबराव चौधरी, कुंजीरवाडी चे उपसरपंच चंद्रकांत मेमाने, माजी उपसरपंच दत्तात्रेय कुंजीर, माजी सरपंच सचिन तुपे, श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक संदीप धुमाळ,माजी उपसरपंच कैलास तुपे, मुंबई महापौर केसरी आबा काळे, जेष्ठ नागरिक संघाचे सोनबा चौधरी, महादेव कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य अजय कुंजीर,अर्चना धुमाळ,दीपक ताम्हाणे,श्रीनाथ पतसंस्थेचे संचालक राहुल धुमाळ, ग्राम विस्तार अधिकारी बाळासाहेब कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.हे प्रदर्शन रविवार दि २६ डिसेंबर पर्यंत चालू राहणार असून यात शेतीसह गृहोपयोगी साहीत्य साधने येथे मांडले आहेत.

         यावेळी प्रतापराव गायकवाड यांनी भविष्यात येऊ घातलेल्या अन्नटंचाई संदर्भात भाष्य करताना शेती हळूहळू कमी होत असून उत्पादनही कमी होत आहे येत्या काही काळात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार असून स्वयंपूर्ण देश आयातीवर अवलंबून राहतील अशावेळी अन्नधान्याच्या किमती प्रचंड वाढतील त्यासाठी प्रत्येकाने शेती उत्पादनावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले तसेच माजी संचालक पांडुरंग काळे यांनी उपस्थित केलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की पूर्व हवेलीतील अनेक नेत्यांकडे असे कारखाने चालविणे इतपत आर्थिक ऐपत आहे जर त्यांनी एकत्र येऊन मार्ग काढला तर हा कारखाना पुन्हा नव्या जोमाने उभा राहू शकतो

          सध्या शेतीमालाला चांगले दिवस आहेत कारण ज्यावेळी उसाला चांगला भाव मिळतो तेव्हा भाजीपाला पिकाला चांगले दिवस येतात म्हणून कारखान्यास पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन माजी संचालक पांडुरंग काळे यांनी केले
         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंजीरवाडीचे माजी सरपंच संतोष कुंजीर,गणेश शेलार यांनी केले  तर माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *