थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) शारदा ग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी यांच्यावतीने “बाल जीवित व हमी” योजने अंतर्गत बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये या आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या आठ गावातील कुपोषित बालके तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व इतर आजारांनी ग्रस्त ४२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

          या शिबिरात डॉ. नितीन वाघमारे या बाल आरोग्य तज्ञांनी येथे उपस्थित असणाऱ्या मातांना बालकांच्या आरोग्य संदर्भात त्यांच्या औषधोपचार संदर्भात कशी काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच बालकांची तपासणी करून औषधोपचार केले. हे शिबिर यशस्वी व्हावे यासाठी आठ गावातील आरोग्य सेविका आशा सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांनी मोठे सहकार्य केले आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ महेबुब लोखंडे यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ दलाल, डॉ वाघमारे, डॉ कदम, आरोग्य सहाय्यक संजय औंधकर, राजेश जाधव व शेलार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *