थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील शौर्यस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून अनुयायी येत असतात यात थेऊरमार्गे जाणाऱ्या अनुयायांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आली होती यात अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली उपस्थित नागरिकांनी व पदाधिकाऱ्यानी आपल्या कल्पना मांडल्या त्या पोलिसांनी ऐकून त्यावर काही सूचना केल्या परंतु सर्वात अडचणीचा असलेल्या थेऊर फाटा ते थेऊर गाव त्या मार्गाची दुरावस्था झाल्याने या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूम भरण्याचा विषय पुढे आला यावर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या थेऊर येथील केजी फाउंडेशन यांच्या वतीने मुरुमाचे काम केले जाईल असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे यांनी जाहीर केले यास केजी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष खंडू गावडे यांनी त्यास होकार दिला यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांचे स्वागत केले या बैठकीला  सहाय्यक पोलिस आयुक्त हडपसर विभागाचे बजरंग देसाई,लोणीकाळभोरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र मोकाशी,पोलिस निरिक्षक (गुन्हे)सुभाष काळे,थेऊर बीटाचे,सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवड्डशेट्टी,राजु महानोर,हवेली पंचायत समिति सदस्य कावेरी कुंजीर,थेऊरचे उपसरपंच आप्पासाहेब काळे,कुंजीरवाडीचे उपसरपंच चंद्रकांत मेमाणे,ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे,युवराज काकडे, हवेली तालुका रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष मारुती कांबळे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष आनंद वैराट,केजी फाउंडेशनचे अध्यक्ष खंडू गावडे,बहुजन मुक्ती पार्टी युवक अध्यक्ष अमोल लोंढे,वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ लोंढे शिवसहकार आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल कुंजीर,मुंबई महापौर केसरी आबा काळे, कुंजीरवाडीचे पोलिस पाटील मिंलिद कुंजीर,थेऊरचे पोलिस पाटील रेश्मा कांबळे,बौध्द महासंघाचे सिध्दार्थ कांबळे,लक्ष्मण चव्हाण सहदेव खंडागळे तसेच नायगाव,पेठ, कुंजीरवाडी या गावचे नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *