थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव झाल्यानंतर या नव्या व्हेरियंटने आपले जाळे हळूहळू देशात पसरवण्यास सुरुवात केली त्यामुळे नागरिकात याबाबत उत्सुकता व भीती निर्माण झाली त्यात वेगवेगळी माहिती समोर येत असल्याने नागरिकात अस्वस्थता दिसून येत आहे याचा सकारात्मक परिणाम म्हणजे गेल्या काही दिवसात लसीकरण केंद्रावर होत असलेली गर्दी होय देशातील बहुतांश भागात लसीकरणाची टक्केवारी उल्लेखनीय असली तरी काही जण भीतीपोटी लसीकरण केंद्राकडे फिरकलेच नाहीत परंतु गेल्या काही दिवसात दक्षिण आफ्रिकेकडून संपूर्ण जगात दहशत पसरवणार्‍या कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरीएटनी जगाची झोपच उडवली अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित केले भारतात या नव्या व्हेरीएटनी शिरकाव केला हळूहळू या नव्या व्हेरीएटचे रुग्ण वेगवेगळ्या राज्यात दिसून येऊ लागले त्यामुळे भितीपोटी घरी राहिलेले व लसीकरण न झालेले नागरिक आता लसीकरण केंद्रावर गर्दी करताना दिसत आहे याचा परिणाम लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर रांगा दिसून येत आहेत एवढेच नाही तर अनेक जण चौकशी करताना दिसून येत आहे पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी, वाघोली, लोणी काळभोर, उरळी कांचन या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर चालू आहे नागरिकांची गर्दी पहावयास मिळत आहे काही जणांचे पहिले डोस आणि काहींचे दुसरे डोस चालू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *