पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  ओमायक्रोनचा धोका देशात दिवसेंदिवस वाढत असून एकूण 14 राज्यात या नव्या व्हेरियंटने शिरकाव केला आहे देशात एकूण दोनशे वीस रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्रात ६५ रुग्ण नोंदवले आहेत विदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांना तपासणी करूनच सोडले असताना रुग्णांचा फैलाव झाला कसा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे विदेशातून आलेल्या प्रवाशांना वेळीच विलगीकरण करून ठेवले असते तर ओमायक्रोन देशात पसरला नसता परंतु कोठे ढिलाई झाली याचा तपास करणे गरजेचे आहे

ओमायक्रोन डेल्टापेक्षा अधिक घातक असल्याने यावर वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे आहे त्यामुळे प्रशासन जागे झाले असून केंद्राने राज्यांना विविध निर्बंध घालण्याच्या सूचना दिल्या आहेत यात रात्रीचा संचार बंदी व अन्य कोणते उपाय योजना करण्यास सांगितले आहे सध्या दररोज अनेक रुग्ण बाहेर येत आहे ही प्रवासी सर्वसामान्य नागरिक आत कसे मिसळले याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे यामुळे पुन्हा देशावर लॉकडाऊन लागण्याची भीती निर्माण झाली आहे या यांचा वेग तीन पट अधिक असल्याने दिवसेंदिवस भीती वाढत आहे राज्य शासन तसेच केंद्र सरकार यांनी यावर वेळीच प्रतिबंध घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *