थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे महा नगर पालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी सतरा ग्रामपंचायत मधील ६५८ जणांची बोगस भरती झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या संबंधातील चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नुकताच सुपूर्त केला याप्रकरणी १४ ग्रामसेवकास सह दोन विस्ताराधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बोगस नोकर भरतीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तात्कालीन महिला व बाल विकास अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते यात सतरा ग्रामपंचायतीत बोगस नोकर भरती झाल्याचे निष्पन्न झाले आहे या नोकर भरती मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे या चौकशी समितीत उघड झाले आहे परंतु या आर्थिक व्यवहाराची चौकशी सक्षम प्राधिकरणामार्फत होणे गरजेचे असल्याचे या समितीने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा छडा लावून अनेक मासे या गडाला लागतील असे स्पष्ट होते
