पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात आज झालेल्या बैठकीनंतर एस टी कामगारांनी सपं मागे घेतल्याची गुजर यांनी घोषणा केली व कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याच्या सूचना केल्या परंतु गुजर यांची मर्यादित संघटना असून आम्ही विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम असून संप चालू राहणार असल्याचे संपकरी कामगारांनी आझाद मैदानावर घोषणा केली.
राज्यातील जवळपास ९२ हजार एस टी कर्मचारी गेल्या दीड महिन्यापासून राज्य शासनात एस टी चे विलीनीकरण करण्यासाठी संपावर आहेत यादरम्यान एस टी कर्मचऱ्याच्या प्रलंबित मागण्या राज्य शासनाकडून मान्य करण्यात आल्या यात वेतनवाढ तसेच प्रत्येक महिन्याला १० तारखेच्या आत पगार बँकेत जमा करणे एवढे आश्वासन देऊनही हे कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत.
ही लढाई न्यायालयात सुद्धा चालू असून कर्मचऱ्याची बाजू सुप्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते हे लढत असून आजच्या सुनावणी दरम्यान त्यांनी कामगार हे संपावर नाही तर दुखावटा पळत आहेत हे सांगितले या संपकाळात अनेक कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे आम्हाला जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवण्यात येईल असे स्पष्ट केले.
आज दिवसभरात परिवर्तन मंत्री यांच्यासोबत कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी चर्चा करून एक त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून त्या समितीच्या अहवालानुसार निर्णय घेण्याचे निश्चित केले तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली जाईल तर विलीनीकरनाचा लढा न्यायालयात चालू राहील वेळ पडली तर सर्वोच्च न्यायालयात सुध्दा हा लढा लढू असे सांगून हा संप मागे घेत असल्याचे अजय गुजर यांनी घोषित केले.
ही बातमी आझाद मैदानावरील संपकरी कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी संताप व्यक्त करत गुजर हे मर्यादित कर्मचाऱ्याचे नेते आहेत आमचा लढा अँड गुणरत्न सदावर्ते हे लढत असून आम्ही त्यांच्या पाठीमागे ठाम उभे आहोत कारण ही लढाई संघटना विरहित आहे असे कामगारांनी स्पष्ट केले.
