थेऊर (हवेेलीनामा ऑनलाइन) लोणावळ्याहुन आपल्या माहेरी आळंदी म्हातोबा येथे निघालेल्या गरोदर महिलेला रस्त्यातच प्रसव वेदना सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता दरम्यान कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी धाव घेतली महिलेची परिस्थिती पाहता अतिशय गंभीर होती भरपूर रक्तस्राव झाल्याने ती महिला खूप अशक्त होऊन बेशुद्ध अवस्थेत गेली डॉ महेबूब लुकडे यांनी वेळेचे महत्व ओळखून लगेच उपचार सुरु केले
त्या महिलेच्या अंगातील बरेच रक्त वाहिले होते व बाळाचा जन्म देखील अर्धवट झालेला.डॉक्टरानी शर्थीचे प्रयत्न केले परंतु केवळ आईला वाचविण्यात यश आले काळ आला होता पण वेळ आली नव्हती एका गरोदर महिलेला वेळेत उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला परंतु दुर्दैवाने बाळ वाचवता आले नाही. यात डॉक्टरासोबत त्याचे सहकारी परिचारिका यांनी मोलाचे योगदान केले.
