पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  जागतिक पातळीवर ओमीक्रोनची दहशत निर्माण झाली असताना विशेषतः या व्हेरियंतचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याने यावर त्वरित पावले उचलली जाणे आवश्यक होते अशावेळी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला (Covovax) जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाल्याची माहिती आदर पुनावाला यांनी ट्विट करून दिली आहे. राज्यात ओमीक्रोनचा फैलाव होत असताना ही एक आशादायक बातमी आली आहे, राज्य सरकारकडून लसीकरणाची वयोमर्यादा कमी करण्याचा विचार सुरू होता, मात्र आता ती वेळ टळणार आहे. लहान मुलांसाठी वेगळी लस तयार करण्यात यश मिळाले आहे त्यामुळे १८ वर्षे वयोगटावरील लस देऊन जोखीम पत्करण्याची आवश्यकता नाही, सीरमने १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी वेगळी Covovax ही लस तयार केली आहे. त्यामुळे आता लवकरच लहान मुलांचे लसीकरण करण्यास सुरूवात केली जाऊ शकते.

          या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी मिळण्याची आवश्यकता होती, ती मिळाल्याने पुनावाला यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परवानगी मिळविण्यात येईल आणि त्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्याता आहे. युरोपतही मुलांचे लसीकरण १५ डिसेंबरपासून सुरू केले आहे. ओमिक्रॉनच्या धास्तीने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात मात्र अजून प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *