राजगुरुनगर  (हवेलीनामा ऑनलाइन)  पीएमपीएमएल बसमध्ये मंचर ते राजगुरुनगर प्रवासादरम्यान जेष्ठ महिलेच्या पिशवीेतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत लता दिलिप पडवळ (वय ५३, रा. आंबेगाव पठार (पुणे), मुळ रा. म्हाळूंगे पडवळ, ता. आंबेगाव ) यांनी  अज्ञात चोरट्यांविरुध्द खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
       याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता पडवळ या मुळ गावी म्हाळूंगे पडवळ येथे कामानिमित्त पतीसह आल्या होत्या. पुन्हा आंबेगाव पठार, पुणे येथे जाण्यासाठी मंचर (ता. आंबेगाव ) येथे पीएमटी बसमध्ये बसल्या होत्या. त्यांच्या पिशवीतील पर्समध्ये चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व रोख१० हजार रुपायांची रक्कम ठेवली होती. बस निघाल्यावर मंचर, भोरवाडी, अवसरी फाटा येथे प्रवाशी बसत व उतरत होते. राजगुरुनगर येथे बस आल्यानंतर लता पडवळ यांच्या लक्षात आले की, पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *