थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे शहरात अलीकडेच समाविष्ट झालेल्या लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पुन्हा विभाजन करून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या अखत्यारीत उरुळी कांचन या नवीन पोलीस स्टेशनला मांजरी देण्यात आली आहे त्यामुळे हा भाग पुन्हा ग्रामीण पोलिसात समाविष्ट होणार आहे.
पुणे शहराचा विस्तार होत असल्याने शहराशेजारील लोणीकंद व लोणी काळभोर ही दोन पोलीस ठाणे पोलीस पुणे आयुक्तालयास जोडण्यात आली त्यानंतर पुणे पोलिसांनी या भागात सेवा देण्यास सुरुवात केली परंतु शहरी भाग व ग्रामीण भाग यात मोठा फरक असल्याने तसेच लोकसंख्येची घनता विरळ असल्याने सेवा पुरवताना शहर पोलिसांना धावपळ करावी लागली
सुरुवातीपासूनच उरुळी कांचन हे ग्रामीण पोलीस क्षेत्रात समाविष्ट होण्याच्या बातम्या येत होत्या परंतु एकवेळ समावेश झालेले पोलीस स्टेशन पुन्हा ग्रामीण मध्ये रूपांतरित होईल याबाबत मतमतांतरे येत राहिली पण अखेर यास मान्यता मिळाली आहे.यासाठी दि १६ जूनला यासंदर्भात विभाजनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यावर दि ५ ऑक्टोबर रोजी सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत याला मान्यता देण्यात आली.त्यानुसार दि १३ रोजी उरुळी कांचन पोलीस स्टेशनला मान्यता मिळाली आहे.
या पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस निरीक्षकासह चार सहाय्यक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षक तसेच १५ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक २० पोलीस हवालदार २५ पोलीस नाईक व पोलीस शिपाई असा एकूण १०० जणांचा पोलीस स्टाफ मंजूर करण्यात आला आहे यासाठी लागणारा वार्षिक आवर्ती व अनावर्ती खर्चाची करतून अनुदानातून भागविण्यात येणार आहे.
