थेऊर (हवेलीनामाऑनलाइन) पुणे सोलापूर महामार्गवरील कुंजीरवाडी येथील व्यवसायिकास मोक्यात अटकेत असलेल्या विष्णु जाधव याचा नंबर कारी असल्याचे सांगून दोघांनी वारंवार फोन करून तसेच प्रत्यक्ष येऊन दमदाटी करून दोन लाख रुपयांची खंडणीची मागणी केली.आज याबद्दल लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राजू गायकवाड रा शिंदवणे व घनश्याम उर्फ आत्माराम शिंदे रा कुंजीरवाडी यांनी आपण गुंड विष्णू जाधव याचे हस्तक असल्याचे सांगून आण्णासाहेब तानाजी खलसे यांना वारंवार फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून खंडणीची मागणी केली यावर त्यांनी लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना खंडणीखोरांना पकडण्याच्या सूचना केल्या. त्यांनी लगेच आपल्या पथकासह हरकतीत येऊन त्या दोघांना गजाआड केले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर,पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव,सुनील नागलोत संभाजी दिवेकर,पोलीस शिपाई बाजीराव वीर निखिल पवार,शैलेश कुदळे आदींनी केली.
