राजगुरुनगर (हवेलीनामा ऑनलाइन) राजगुरुनगर येथे प्रतिवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ४२ वे वर्ष असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे अध्यक्ष तथा राजगुरुनगरचे माजी सरपंच शांताराम घुमटकर व प्रदीप कासवा यांनी दिली. या सप्ताहाचा प्रारंभ बुधवार पासून (दि. १५) होत असून दि. २२ डीसेंबर रोजी या सप्ताह कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सप्ताह काळात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्त्रनाम, दुपारी नेमाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, त्यानंतर हरिकीर्तन आणि अखंड वीनानाद असे कार्यक्रम होणार आहेत. या कालावधीत ह.भ.प. लक्ष्मण महाराज रेटवडेे (राजगुरुनगर), ज्ञानेश्वर महाराज फलके (आमोंडी), शंकर महाराज शेवाळे ( मंचर), बबन महाराज शिनलकर (लोणी), रंगनाथ महाराज नाईकडे (कडधे), गणेश महाराज शिंदे, गुलाब महाराज खालकर (आर्वी), एकनाथ महाराज चत्तर (शास्त्री) यांची कीर्तने होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमांसाठी परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
