पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम, बुलडाणा या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम, बुलडाणा मतदारसंघामध्ये निवडणूक लागली. अकोला, वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया तर भाजपचे वसंत खंडेलवाल  यांच्यात  थेट झाली यामध्ये भाजपचेे उमदेवार विजयी झाले. नागपूरमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे  विजयी झाले आहेत. छोटू भोयर यांच्या जागेवर आयत्यावेळी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला परंतु ते पराभूत झाले आहेत.

अकोला, वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात सरळ लढत झाली. यात भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी झाले. गोपिकिशन बाजोरिया तीन वेळा आमदार राहिले. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे काँग्रेस १९०, शिवसेना ७६ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस १३० असे एकूण ३९६ मते आहेत तर भाजपाकडे २४४ मते आहेत.  या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे ८५ तर अपक्ष १७१ असे एकूण २५६ मतदार होते. महाविकास आघाडीची एकूण ३९६ मतं होती. मात्र, गोपिकिशन बाजोरिया यांना ३३१ मतं मिळाली. म्हणजेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मतं फुटल्याचं समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *