थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) थेऊर येथे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या धक्क्याने तिच्या पतीनेही तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली त्यात तो गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
थेऊर येथील काकडेमळा येथे राहणाऱ्या आश्विनी रामेश्वर लाखे वय २८ वर्षे या विवाहितेने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली परंतु आत्महत्या का केली याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.ही घटना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
आत्महत्या केलेल्या महिलेची दोन वर्षे वयाची मुलगी घरात रडत असताना बाजूच्या नागरिकांना आढळली त्यामुळे त्यांनी दरवाजा बंद दिसला आत ते बाळ रडत होते दरम्यान तिचा पती रामेश्वर तेथे आला त्याने ते दृष्य पाहिले व तिसऱ्या मजल्यावर जाऊन सर्वांसमक्ष उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु तो त्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे
या घटनेची माहिती मिळताच थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, पोलीस अंमलदार नरेंद्र सोनवणे घटनास्थळी पोहोचले व पुढील कारवाई केली.
