पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) हिंदू सत्यासाठी मरतो. सत्य हाच त्याचा मार्ग आहे. तो जीवनभर सत्याच्या शोधात असतो. महात्मा गांधींनी संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात घालवले.तर हिंदुत्ववादी गोडसेने त्यांच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही घेणं देणं नाही. हिंदू हा सत्याचा शोध घेत असताना कधीच कुणापुढे झुकत नाही. मात्र, हिंदुत्ववादी हा सदा द्वेषाने पछाडलेला असतो. कारण त्याच्या मनात भीती असते, असं राहुल गांधी म्हणाले ते जयपूर मध्ये आयोजित काँग्रेस च्या विशाल सभेत बोलत होते,त्यांनी भाजप वर जोरदार प्रहार केला.
.”तुम्ही सर्वजण हिंदू आहात. हिंदुत्ववादी सत्तेसाठी भुकेला आहे. सन२०१४ मध्ये हिंदुत्वावादी सत्तेत आले. पण हिंदू आजही सत्तेपासून दूर आहे. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूंना सत्तेत आणायचं आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.आपल्याला घाबरवलं जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला घाबरत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे. त्यांना सत्य नको आहे. त्यांचा मार्ग सत्याग्रहाचा नाही. तर सत्ता ग्रहचा आहे. हिंदू नेहमीच भयाशी संघर्ष करत असतो. ते महादेवाप्रमाणे विष प्राशन करतो, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी गांधी आणि गोडसेंमधील फरकही समजावून सांगितला. हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन शब्दांची आत्मा एक सारखी असूच शकत नाही. मी हिंदू आहे. पण हिंदुत्ववादी नाही. या देशात या दोन शब्दांचा संघर्ष आहे. एक शब्द आहे हिंदू आणि दुसरा आहे हिंदुत्ववादी आहे. हे दोन्ही शब्द एक नाहीत. हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. महात्मा गांधी हिंदू होते, तर गोडसे हिंदुत्ववादी, असंही त्यांनी सांगितलं.
