पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विदयापीठाच्या एमआयटी स्कूल आफ फुड टेक्नॉलॉजी आणि हंगेरी येथील डेब्रेसन विद्यापीठात यांच्या नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे दोन्ही विद्यापीठातील विदयार्थी आणि शिक्षक यांच्या आदान-प्रदानाला महत्व देण्यात आले आहे. यामुळे संशोधन, एकत्रित पदवी प्रदान करण्यात येईल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकत्रित सेमिनार, वेबिनार आयोजित करण्यात येतील.
एमआयटी एडीटी विद्यापीठातील मेकॅनिकाल इंजिनिअरिंग, एमआयटी कॉलेज ऑफ मैनेजमेंट व स्कुल ऑफ फुड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फायदा होईल. डेब्रेसेन विद्यापीठाचे व्हाईस रेक्टर एलेक बारता व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव यांनी या सामंजस्य करारावार स्वाक्षरी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तेजस कराड यांनी केले. प्रा. सुजित फुंदे यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. इशिता गाडगीळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा फैयाज पठान यांनी केले यावेळी डॉ. सुनिता कराड डॉ. महेश चोपडे, डॉ. अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
