वाघोली (हवेलीनामा आॕनलाईन) वाघोली- केसनंद रस्त्यावरील निकृष्ट व संथ गतीने काम चालू असल्याने याचा स्थानिक नागरिक व प्रॉब्लेम सोलव्हर टीम च्या वतीने खड्डे बुजवून सार्वजनिक बांधकाम खात्याचा तसेच संबंधित ठेकेदाराचा निषेध करण्यात आला
           गेली अनेक दिवसापासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता असून या मार्गवर लहान मोठ्या वहानाचे मोठी वर्दळ असते यात प्रवास करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून यात दुचाकी खड्यात अपटून अपघात होण्याची शक्यता असून देखील प्रवासाच्या जीवशी चाललेला हा खेळ थांबणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या रस्त्याच्या कामाला गती येईल का याची नागरिक वाट पाहत आहेत या रस्त्यावरील खड्डे नागरिकांनी तसेच प्रोब्लेम सोलव्हर गृपच्या सदस्यांनी आंदोलन करून स्वतःच खड्डे बुजविण्याचे काम चालु केले
             यावेळी पीडब्ल्युडी प्रशासन व ठेकेदारांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली वाघोलीतील अडचणीच्या रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी सर्व ग्रामस्थांमार्फत प्रशासनाकडे पाठपुरावा चालू आहे.
यावेळी वाघोली केसनंद रोड वरील नागरिक, प्रोब्लेम सोलव्हर चे सदस्य उपस्थित होते.
        भाजप युवा मोर्च्याचे हवेली तालुका अध्यक्ष अनिल सातव यांनी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास या अक्षम्य दुर्लक्षासाठी जबाबदार धरले असून यावर त्वरित लक्ष घालून काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलन केले जाईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *