पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  राज्याच्या शालेय शिक्षण विभाग आणि बालभरती यांनी शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचा भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी बालभारती एक पुस्तकी योजना राबवणार आहे.यात पहिलीच्या चार विषयांसाठी एकच पाठ्यपुस्तक तयार करण्यात येणार आहे. या एका पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित आणि खेळू आणि शिकू या विषयांचा एकत्रित समावेश असेल.

शालेय शिक्षण विभाग बालभारतीच्या सहकार्याने एक पुस्तक योजना येत्या वर्षात राबवण्यात येणार आहे. सुरुवातीला पहिलीच्या वर्गापासून हा उपक्रम राबवण्यात येईल. मात्र, येत्या काळात सर्व इयत्तांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातील ४८८ शाळांमध्ये एक पुस्तक योजना राबवण्यात येत असून त्याला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बालभारती कडून मिळालेल्या माहितीत समजले.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि बालभारतीच्या वतीनं हा एक पुस्तक योजना उपक्रम नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुसार घेण्यात आला आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तकं मोफत मिळणार आहे.

एक पुस्तक योजनेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या पुस्तकामध्ये पहिली घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, दुसरी घटक चाचणी, द्वितीय सत्र परीक्षा अशा चार विभागांमध्ये पाठ्यपुस्तकांची रचना असेल. चारही परीक्षांसाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक असणार आहे. विद्यार्थ्यांना सत्रानुसार परीक्षा आणावी लागणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *