थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने अनेकांना सर्दी आणि खोकला होणे सामान्य समस्या आहे. तसेच या हंगामात स्वतःची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात निरोगी जीवन जगण्यासाठी आपण काही घरगुती उपचार केले तर  फायद्याचे ठरू शकतात.
            तुळशी ही अँटिसेप्टिक आणि अँटीव्हायरल गुणधर्म असलेली औषधी वनस्पती आहे. सर्दी आणि फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गापासून तुळस आपल्याला दूर ठेवण्यास मदत करते यामुळे या हंगामात आपल्या आहारामध्ये तुळशीच्या पानांचा समावेश आवश्य करावा.
           हळद ही सुद्धा अँटीव्हायरल गुणधर्म असणारी दुसरी वनस्पती त्यात अँटी इन्फ्लूएंझा व्हायरस असतात. तसेच त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. यामुळे दररोज कोमट पाण्यामध्ये हळद मिसळुन पितात. हिवाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये जास्तीत-जास्त हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *