थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  ओ बी सी आरक्षण अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर सर्वच ओ बी सी नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता असून याचाच एक भाग  भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक संकल्प करण्याचे जाहीर केले असून, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र  लिहिले आहे कदाचित हा संकल्प यांच्याशीच निगडित असण्याची शक्यता आहे. गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबर रोजी जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले आहे. १२ डिसेंबर, ३ जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही असे पंकजा मुंडे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. तसेच १२ डिसेंबरला आपण एक संकल्प करणार आहोत, तो संकल्प तुम्ही पूर्ण करणार का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या पत्रात केला आहे. त्यांनी हे पत्र ट्विट देखील केले आहे.
          दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबरला जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजीमंत्री तथा भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना एक पत्र लिहीले आहे. १२ डिसेंबर, ३ जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही. गोपीनाथ गडावर आतापर्यंत अनेक जण येवून गेले, अनेक दुःखी कुटुंबांना गोपीनाथ गडावरून मदत करता आली त्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले, हे आशीर्वाद चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी असतील, हे आशीर्वाद धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी असतील असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्याच वेळी १२ डिसेंबरला एक संकल्प करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. हा संकल्प पूर्ण करणार का असा सवाल त्यांनी या पत्रातून आपल्या कार्यकर्त्यांना विचारला आहे. मात्र हा संकल्प नेमका काय असणार हे या पत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या या नव्या संकल्पाबाबत कार्यकर्त्यांसह सर्वांनाच उत्सुकता  आहे.
        राज्यातील इतर मागासवर्गीय नागरिकांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे स्थान सर्वोच्च होते त्यांचा वारसा पंकजा मुंडे पुढे चालवत आहेत त्या काय संकल्प करणार आहेत हे लवकरच कळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *