थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेत महावीर उत्तम जगदाळे (वय ३२, रा. उरळी कांचन) आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल उत्तम जगदाळे (वय ५८, रा. करमाळा) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी तरुणाच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.लॉकडाऊनच्या काळात काम नसल्याने पती पत्नीत वाद होत असत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर जगदाळे यांचे ७ ते ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तो मिळेल ते काम करीत असे. त्याची पत्नी एका बांधकाम व्यावसायिकाकडे ग्राहकांना जागा दाखविण्याचे काम करते. लॉकडाऊनच्या काळात काम नसल्याने महावीर हा काही काळासाठी गावाला गेला होता. परतल्यानंतर तो काही काम करीत नसल्याने पती पत्नीत भांडणे होत होती. ही बाब त्याच्या पत्नीने आपल्या सासर्यांना सांगून त्यांना पुण्याला बोलावून घेतले होते. त्यांनी येऊन समजून सांगितले होते. त्यानंतर ८ दिवसांनी महावीर याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करीत आहेत.
