थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) लोणी काळभोर पोलीस स्टेशन शहर पोलिसात समाविष्ट झाल्यानंतर ग्रामसुरक्षा दलाचे काम हळूहळू कमी होत गेलं त्यावर विशेष पोलीस अधिकारी म्हणून काही नियुक्त्या झाल्या हे एस पी ओ या नावाने कार्यरत असून पोलिस चौकीच्या कार्यक्षेत्रात आपले काम करत आहेत. पोलिसांवरील कामाचा ताण पाहता विना मोबदला हे आपले काम चोख बजावत आहेत अशात त्यांना रात्र गस्त करीत असताना थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी नायगावच्या माजी उपसरपंच कल्पना चौधरी यांनी सामाजिक बांधिलकी जपत ट्रॅकसूट वाटप केले
थेऊर पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस चौकीत चार पोलीस कर्मचारी व पाच एस पी ओ अहोरात्र सेवा देतात नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी त्यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते त्यामुळे या परिसरात सध्या समाधानाचे वातावरण आहे मागील काही दिवसात काही घरफोडीच्या घटना घडल्या त्यामुळे थेऊर चौकी परीक्षेत्रात येणाऱ्या कुंजीरवाडी नायगाव पेठ तरडे आळंदी म्हातोबा या ठिकाणी रात्रगस्त घालण्यात येते यासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचऱ्याच्या मदतीसाठी हे एस पो ओ कायम सोबत असतात.
सध्या थंडीचा कडाका वाढत असल्याने ट्रकसूट असणे गरजेचे होते त्यावर नायगावच्या माजी उपसरपंच कल्पना चौधरी यांनी त्याची व्यवस्था केली या कार्यक्रमासाठी थेऊर पोलीस चौकीचे अधिकारी श्रीशैल्य चिवडशेट्टी, भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या पूनम चौधरी, माजी उपसरपंच शिवाजी चौधरी, गणेश चौधरी,थेऊरच्या पोलीस पाटील रेश्मा कांबळे,गंगाराम चौधरी, संजय चौधरी,काळुराम चौधरी, संतोष चौधरी बांधकाम व्यावसायिक संभाजी काळे व नितीन भोसले उपस्थित होते
