थेऊर (हवेलीनामा आॕनलाईन) पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन  शाखा हवेली तालुका येथील युनियनची पंचवार्षिक पोटनिवडणूक नुकतीच घेण्यात आली यावेळी  महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिल कुंभार, पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गावडे हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय अध्यक्ष  अमोल घोळवे, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ, पुणे जिल्हा सरचिटणीस अनिल बगाटे,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप ठवाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पाडली. याप्रसंगी हवेली तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष पदी पोपटराव वेताळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिव पदी सविता भुजबळ यांची व उपाध्यक्ष पदी  तुकाराम पाटिल आणि  मुटेकर ,महिला उपाध्यक्ष पदी  स्मिता विरकर ,महिला सदस्य पदी ज्योती तांबे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रल्हाद पवार यांनी केले तर नवनिर्वाचित अध्यक्ष पोपटराव वेताळ यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून संघटनेच्या कामास गती देऊन काम करु असे सांगितले

पुणे जिल्हामध्ये सचिव या पदावर महिलांना संधी दिली जात नव्हती पण एक महिला आपल्या हवेली तालुका मध्ये काम करताना ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्न कसे सोडवायचे महिला ना संधी दिली तर जिल्हा पातळीवर महिलांचे प्रश्न सोडण्यात हातभार लागेल ह्या हेतूने सविता भुजबळ यांची हवेली तालुका सचिव पदावर निवड करण्यात आली.निवडी नंतर सविता भुजबळ यांनी तालुक्यातील सर्व सभासदांना जेष्ठ सभासदांना आणि महिलांना सोबत घेऊन आणि प्रामुख्याने महिलांचे प्रश्न सोडवून ग्रामसेवक सवर्गास न्याय देणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *