किरण खुडे
राजगुरुनगर  (हवेलीनामा ऑनलाइन)  खेड तालुक्यातील चांदुस येथे भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दोघाना खेड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करून अटक केली आहे. महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय १९, रा. सुलतानपुर, मंचर ता. आंबेगाव) , चंद्रशेखर उर्फ राहुल शिवाजी राजगुरु (वय २४, रा. इंदीरानगर, मंचर, ता. आंबेगाव ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली.
      या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की,  सप्टेंबर महिन्यात चांदुस येथे साधना अंकुश कारले ह्या राहत्या घराला कुलुप लावून माहेरी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेजारील नातेवाईकाच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आतील भिंतीवरुन कारले यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील ८२.३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकुण दोन लाख,९३ हजार,४४० रुपयांचा मुद्देमाल  चोरून नेला होता. त्याबाबत कारले यांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांना तपास करत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की,संशयीत आरोपी चांदूस येथे फिरत असताना दिसले होते. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिने हे भांबोली (ता. खेड ) येथील ते राहत असलेले सदनिकेमध्ये ठेवल्याचे सांगितले. सोन्याचे दागिने आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *