थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी सरकारच्या अनेक योजना असतात.परंतु त्या शेतकरी लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाहीत. आता राज्यातील कष्टकऱ्यांना मदतीचा हात द्यावा म्हणून प्रशासन पुढे सरसावले आहे. त्यानुसार एका योजनेंतर्गत दुधाळ जनावरांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोण पत्र असेल कुठे अर्ज करायचा हे जाणून घ्या.
पशुसंवर्धन विभागामार्फत नावीण्यपूर्ण योजनेतंर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप लाभाासाठी अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती या प्रवर्गातील १८ वर्षांवरील इच्छुकांनी १८ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल, असे आवाहन पशुसंवर्धन खात्याने केले आहे.
ही एक नावीण्यपूर्ण योजना असून यात २ दुधाळ गाई, म्हशीचे गट वाटप करणे, १०+१ शेळी, मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे यासाठी ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच गुगल प्ले स्टोअरवर AH-MAHABMS ॲपवर १८ डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
