थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  एक शालेय शिक्षिका किरण लक्ष्मण शिंदे यांनी राष्ट्रीय विमुक्त भटक्या जनजाती महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची महासभेच्या राष्ट्रीय महासचिव पदी निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष श्रीपाल सिंह नायक यांच्याकडून मिळाले आहे.

         किरण शिंदे या पेशाने शिक्षिका असून त्या गेली अनेक वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभागी असतात.विशेषतः भटक्या विमुक्त जातीजमातीसाठीचे त्यांचे कार्य मोठे आहे.त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह, प्रौढ साक्षरता यासाठी जनजागृती केली तसेच महिला बचत गटाची निर्मिती, शैक्षणिक दत्तक पालक योजना, कॅन्सर जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाव, महिला व तरुणींसाठी मोफत स्व संरक्षण मार्गदर्शन यासह वृक्षारोपण या सारखे पर्यावरण विषयक कार्यक्रम राबवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *