थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  एका पुजाऱ्यास जादूटोण्याच्या कायद्यात पोलिसात गुन्हा दाखल करू अशी भीती दाखवून वारंवार पैशाची मागणी करून त्रास देणाऱ्या एक महिलेसह अन्य दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना युनिट ६ ने अधिक तपास करण्यासाठी ताब्यात घेतले आहे त्यांचेकडून आणखी गुन्हे घडले आहे का हे तपासात कळेल.

         लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोणीकंद येथील अर्जुन आतकर हे देवीचे भक्त असून त्यांच्याकडे यलम्मा देवीचे मंदिर आहे अनेक भक्त दर्शनासाठी येतात व आपल्या इच्छेनुसार देवीस दक्षिणा देतात.असेच तीन महिन्यांपूर्वी एक महिला सोनल मगर व दोन व्यक्ती विनायक लावंड व अभिजित दरेकर हे देवीच्या दर्शनासाठी आले त्यावेळी सोनल हिने तिचे व तिच्या सासूचे पटत नाही त्यावर उपाय सांगा असे सांगितले त्यावर देवी सगळं नीट करील असे त्याने सांगितले.त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेने फोन करून ५० हजार रुपयांची मागणी केली आणि पैसे दिले नाही तर तुझ्या विरुद्ध जादूटोणा व भोंदूगिरी चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली त्यामुळे त्यांनी ते पैसे दिले त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी घरी येऊन सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली त्यावेळी हातातील सोन्याची अंगठी काढून दिली तर पुन्हा एके दिवशी विनायक लावंड याने पाच हजार रुपयांची मागणी केली असे वारंवार होणारी छळवणूक टाळण्यासाठी त्यांनी लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
    आणखी एका दुसऱ्या घटनेत लोणी काळभोर येथील एका गृहस्थाच्या कागदपत्रांचा वापर करून २ लाख रुपयाचे कर्ज काढले. जेव्हा बँक वसुली एजंटाने मूळ कर्जधारकाकडे  कर्जाच्या परतफेडीचा तगादा लावला होता जे कर्ज काढलेच नव्हते ती कर्जाची रक्कम वापरलेली नव्हती तर ती रक्कम या महिलेने वापरलेली होती त्यामुळे सदर कर्जाची परतफेड करण्यास कर्जधारकाने तिला सांगितले होते.परंतु त्यांनी ती न भरता उलट कर्जधारकालाच एखाद्या खोट्या दखलपात्र गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी देवुन संपूर्ण कर्जाची बोजा कर्जधारकावर टाकला होता असे याप्रकारचे  बरेच कारनामे तपासा दरम्यान समोर येणार आहेत. तसेच एका युवकास तुझ्या गाडीमध्ये विनापरवाना पिस्तुल ठेऊन तुझ्यावर कारवाई करायला लावेल अशी धमकी दिली.म्हणून यातील पीडितांनी आरपीआयच्या (A) महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्याकडे मदतीचे मागणी केली. गुन्हे शाखा युनिट सहामध्ये आमचा चांगला संपर्क आहे व आमच्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून बदनामी करू अश्या धमक्या देऊन नागरिकांकडून पैसे उकळण्याचे काम ही टोळी गेल्या दोन वर्षांपासून करीत होते.म्हणून ज्या व्यक्तींना आरोपींनी फसवले असेल कींवा अन्य काही खोटे नाटे सांगुन नुकसान झालेल्या व्यक्तीनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *