पुणे( हवेलीनामा आॕनलाईन) महाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाने बाधित रुग्णाची संख्या आठ वर पोहचली असून यात पिंपरी चिंचवड येथील सहा जणांपैकी नायजेरियातून आलेल्या भारतीय वंशाची ४४वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह  भावाला भेटण्यासाठी २४ नोव्हेंबर ला पिंपरी चिंचवड येथे आली त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
      या तिघींच्या संपर्कात आलेल्यांची  तपासणी
करण्यात आली असता त्यातील या महिलेचा ४५ वर्षाचा भाऊ आणि त्याच्या दीड वर्षे व ७ वर्षांच्या
दोन मुली या कोविडबाधित आल्या होत्या. या तीन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे सौम्य असून बाकी ५ जणांना कसलीही लक्षणे
नाहीत. या सहा जणांपैकी तिघे हे१८ वर्षाखालील
असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही बाकी तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील एका रुग्णालयात दाखल असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.तर पुणे शहरात एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आणि आळंदीत एक रुग्ण आढळला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रान बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती आता आठवर पोहचली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *