थेऊर (हवेलीनामा आॕनलाईन) पूर्व हवेलीतील गावांमधील विकास कामांना गती देणार असून विविध योजनांच्या माध्यमातून आगामी काळातही विकासकामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देऊन गावांचा विकास करणार असे शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले आहे.कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील सुमारे २ कोटी ११लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करून नवीन कामांचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगीराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हवेलीतालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता
बडेकर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष
कांचन, कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल शितोळे, पेठचे
सरपंच सुरज चौधरी,मुंबई महापौर केसरी आबासाहेब काळे, योगेश शितोळे, राजेंद्र कांचन,आण्णासाहेब महाडिक, सागर कांचन, रघनाथ चौधरी. उपसरपंच लीलावती बोधे सुभाष टिळेकर पोलीस पाटील वर्षा कड तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
आज पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात साकव बांधणे – ३५ लाख, इनामदार वस्ती येथील
शाळाग्रह व खोल्या बांधणे – २२ लाख ५० हजार,
दावसे- कड वस्ती नंबर २ रस्ता – १५ लाख, अंतर्गत
रस्ते मुरमीकरण करणे – १५ लाख, गावठाण सिमेंट
रस्ता १५ लाख, कडवस्ती ते शितोळेवस्ती रस्ता १०
लाख, कोरेगाव मुळ ते कडवस्ती अंतर्गत खडीकरण
१० लाख, कोरेगाव मुळ ग्रामपंचायत कार्यालय समोर
पेवर ब्लॉक बसविणे १० लाख, कोरेगाव मुळ
अंतर्गत रस्ते करणे २० लाख,कोरेगाव मूळ अंतर्गत रस्ता खडीकरण करणे २० लाख, चौरंग मळा येथे बंदिस्त गटार बांधणे-२० लाख, भन्साळी वस्ती ते शितोळे वस्ती रस्ता बांधणे – ८ लाख, तांडावस्ती ते बोधे वस्ती रस्ता ८ लाख, अनुसूचित जाती व नवबौद्धवस्तीत नळ पाणीपुरवठा करणे ५ लाख ६७ हजार,तांडा वस्ती येथे ड्रेनेज ५ लाख, समाज मंदिर बांधणे५ लाख, ओढा बंदिस्त गटार बांधणे -२ लाख ५०हजार, मागासवर्गीय लाईट सुविधा करणे २ लाख ५०हजार, अंगणवाड्या डिजिटल करणे – २ लाख,
शेतमाल ने-आण करण्यासाठी रस्ता तयार करणे – 2
लाख, असा सुमारे २ कोटी ११ लाख १७ हजार अशी कामे केली जाणार आहेत.
