पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) पिंपरी चिंचवड येथे नुकत्याच  पार पडलेल्या सिको काय कप २०२१ कराटे स्पर्धेत पुणे संघाने घवघवीत यश मिळवले येथे झालेल्या काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारात चार सुवर्ण, तीन रौप्य व सात कांस्य अशा एकूण चौदा पदकांची कमाई केली. या स्पर्धेत श्रावणी काळे हिने कुमिते/काता या दोन प्रकारात प्रत्येकी एक असे दोन सुवर्ण पदक पटकावले तर कुमिते प्रकारात कोमल खेनट व  नंदिनी भोईटे यांनी सुवर्ण पदक पटकावले.

काता प्रकारात सिद्धी पोमन,वैष्णवी ताम्हणे यांनी रौप्य पदक पटकावले.दिव्या चव्हाण हिने कुमिते प्रकारात रौप्य पदक मिळविले.रिया चव्हाण,कशिश घाडगे,अभिषेक जाधव,अलोक पवार,वैभव रसाळ हे स्पर्धक काता व कुमिते या दोन्ही प्रकारात कांस्य पदकाचे मानकरी ठरले.या सर्व खेळाडूंना कराटे प्रशिक्षक प्रदीप वाघोले, हेमंत डोईफोडे यांचे मार्गदर्शन लाभले. हे सर्व खेळाडू चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमी पुणे या कराटे क्लब मध्ये कराटे प्रशिक्षण घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *