थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)   महावितरणकडून शेतकरी कृषिपंप तसेच घरगुती वापराच्या वीज बिलाची सक्त वसुली चालू असून यासाठी वीज कर्मचाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत परंतु ही वसुली करताना कर्मचारी व वीज ग्राहक यांच्यात होणाऱ्या वादाकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे वसुलीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण होत असून यासाठी महावितरणकडून पोलीस संरक्षण देण्यासाठी पत्र देने गरजेचे असताना टाळाटाळ केली जात आहे मंगळवारी लोणी काळभोर येथील एका वीज कर्मचर्यास फुरसुंगी भागात शिवीगाळ व धक्काबुक्की झाली तर ती तक्रार घेण्यास पोलिसांना मुळशी विभागाचे पत्र पाहिजे आहे असे सांगितले ते मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत असल्याने फुरसुंगी व लोणी काळभोर येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेऊन आंदोलन केल्याची माहिती मिळाली आहे

           महावितरण कडून ग्राहकाच्या थकबाकी वसुलीचे काम हाती घेतले आहे यात घरगुती व शेती कृषिपंप वीज वसुली चालू आहे कर्मचाऱ्यांना ताकीद दिली आहे की वसुली झाली पाहिजे परंतु असे करताना ग्राहकांबरोबर तक्रारी वाढत आहेत यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसे पत्र संबंधित पोलीस स्टेशनमध्ये देने आवश्यक आहे परंतु असे पत्र दिले जात नाही त्यामुळे पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत आज फुरसुंगी हद्दीत वीज जोडनी करण्यासाठी गेलेल्या पांडुरंग खरात यांना शिवीगाळ व धक्काबुक्की झाली त्यावर सर्व वीज कर्मचारी तक्रार दाखल करण्यासाठी फुरसुंगी पोलीस चौकीत गेले परंतु विभागाचे पत्र नसल्याचे कारण देऊन ही तक्रार घेतली नाही या अगोदर अशाच प्रकारची वीज कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ वाघोली व फुरसुंगीत झाली होती परंतु त्याची दखल वरिष्ठांनी घेतली नाही यामुळे कर्मचार्यावर हल्ला करणाऱ्याचे धाडस वाढत जात आहे.यावरून कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून अधिकारी वसुलीचा तगादा लावतात त्यामुळे संरक्षण मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचे सांगितले.
           काल उशिरा हडपसर पोलिसात याबाबत नोंद झाली असल्याची माहिती मिळाली आहे
वीज कर्मचारी महावितरणसाठी वसुली करतात त्यांच्या संरक्षणासाठी विभागाने सोय करणे आवश्यक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *