किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा ऑनलाइन): खेड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांची तयारी करण्यासाठी निवडणुक आयोगाने निर्देश दिले असुन जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ मधील  आणि डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या वर्षभरात मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना,आरक्षण आदि निवडणुक प्रक्रीया सुरु करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार डाँ.वैशाली वाघमारे यांनी दिली.
       निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार  राज्यभरातील १८४९ ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या काळात संपली आहे तर डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या १३ महिन्यांच्या काळात ६४७७ ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपणार आहे. अशा सर्व ग्रामपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण निश्चित, मतदार यादीचे प्रभागनिहाय मतदार यादी निश्चित करुन प्रत्यक्ष निवडणुक अशा तीन टप्यातील कार्यक्रम येत्या डिसेंबर पासुन सुरु करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने जारी केले आहेत.
           खेड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी येत्या ३ डिसेंबर पासुन  सुरु करण्यात येणार आहे. १) येणिय खुर्द ,२) गारगोटवाडी, ३) येलवाडी , ४) कोरेगाव खुर्द , ५) भांबोली , ६ ) चास , ७) रोहकल ,  ८) बहुळ , ९) देवोशी , १०) मांजरेवाडी , ११) शिरोली , १२) सुरकुंडी , १३) अनावळे , १४) बहिरवाडी, १५) आंभू ,१६) आव्हाट , १७) दौडकरवाडी , १८) मिरजेवाडी , १९) वाडा , २०) पापळवाडी , २१) सिद्धेगव्हाण , २२) साकुर्डी , २३) शेलगाव , २४) साबळेवाडी , २५) चिखलगाव , २६) खरपुड , २७) दरकवाडी , २८) कोयाळी तर्फे वाडा,
    शुक्रवार दि. ३ डिसेंबर २०२१ पासुन प्रशासकीय पातळीवर ग्रामपंचायतीचे गुगल नकाशे काढुन प्रभाग रचनेची स्थळपहाणी करण्यास सुरुवात होणार आहे. दि.९ डिसेंबर पर्यत प्रभाग पाडणे आणि सीमा निश्चित करणे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करणे, ३१ डिसेंबरला आरक्षण सोडतीसाठी ग्रामसभांचे आयोजन करणे, ३ ते १० जानेवारी २०२२ ला प्रभाग रचना, आरक्षण यावर हरकती सुचना मागवणे, १९ जानेवारीला उपविभागीय अधिकारी  यांच्या समोर प्राप्त हरकती सुचनांवर सुनावणी घेतली जाणार आहे. नंतर सर्व सोपस्कार झाल्यानंतर अंतिम ग्रामपंचायतीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवल्यानंतर २ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण आणि प्रभागनिहाय मतदार यादि जाहिर करणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *