थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  पुठ्ठा खरेदीसाठी एका भंगार व्यावसायिकास बोलावून त्याच्याकडून ३ लाख २१ हजार लंपास करणाऱ्या दोन इसमाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशन करीत आहेत.
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनरेश रघुवीर निसाद वय ३८ वर्षे, रा.पाषाण मळा शिरूर, ता.शिरूर, जि.पुणे, भंगार व्यावसायिक यास अज्ञात व्यक्तीने रांजणगाव एम.आय.डी.सी मध्ये पुठ्ठा खरेदी करण्याचा बहाणा करून बोलावून घेतले,त्यामुळे ते आपले दोन कामगार  गोरे निसाद व सुरेश निसाद याना सोबत घेऊन त्यांचेकडील चारचाकी छोटा हत्ती वाहन तेथे पोहोचले. त्याठिकाणी चार अनोळखी व्यक्ती दोन दुचाकीवर येऊन त्यांनी निसाद यास चारचाकी वाहनासह रांजणगाव एम.आय.डी.सी परिसरात फिरवून जिओदान कंपनी जवळील झाडीमध्ये जबरदस्तीने नेले त्या ठिकाणी मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल व रोख सहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर व्यवसायिकास त्याच्या मित्राला तीन लाख रुपये घेऊन बोलाविले, ते पैसे चार अनोळखी व्यक्तींनी त्यांचा पाचवा
साथीदार याला बोलावून घेऊन त्याने ते जबरदस्तीने काढून घेतले.
            गुन्ह्याचे गांभीर्य पाहून गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चालु केला असता,हा गुन्हा  शिरूर शहरातील संकेत शेजवळ व त्याच्या जोडीदारांनी केल्याचे गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यावर संकेत शेजवळ याला शिरूर परिसरातून ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता दरोड्याचा गुन्हा हा संकेत शेजवळ आणि शाहरुख पठाण व
इतर साथीदारांनी केला असल्याची तपास पथकाला माहिती मिळाली. संकेत संजय शेजवळ, शाहरुख गणी पठाण रा . शिरूर, ता.शिरूर, जि.पुणे,
यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली डिलक्स मोटार सायकल व पासष्ट हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली असून त्यांना रांजणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात मुद्देमालासह देण्यात आले असून पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बळवंतराव मांडके हे करीत आहे.
        ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अशोक शेळके, सहा पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा.फौजदार तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीण, अजित भुजबळ, सचिन घाडगे,पोलीस नाईक मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, प्रसन्ना घाडगे, चालक सहा फौजदार मुकुंद कदम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *