थेऊर (हवेेलीनामा ऑनलाइन) भारतीय राज्यघटना ही जगात सर्वोच्च असून याची परिणती म्हणजे आपण गेल्या पंचाहत्तर वर्षात केलेली प्रगती होय या घटनेने देशातील नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रजेचे राज्य निर्माण केले परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले प्रजासत्ताक न राहता सध्या नेत्याचे राज्य बनले आहे असे विचार झुंज प्रतिष्ठानचे सामाजिक न्याय विभागाचे अभ्यासक मल्हार पांडे यांनी व्यक्त केले. ते थेऊर ग्रामपंचायत येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

            आपल्या देशाने दि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान पारित केले त्यानिमित्ताने दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो थेऊर येथे या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद वैराट, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे, खंडू गावडे,सहदेव खंडागळे, कुंजीरवाडी पर्यावरण समितीचे नंदकुमार बारवकर,हिरामण लोंढे,सागर राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिका वाचनाने झाली.
            पांडे यांनी सांगितले की, आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेल्या मूलभूत अधिकार व कर्तव्याची प्रत्येक भारतीयांना जाणीव झाली पाहिजे आम्ही आपले प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात किती विकासात्मक कामे केली याचा लेखाजोखा विचारण्याचा अधिकार देखील संविधानाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *