थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानची उत्तर महाराष्ट्राची विभागीय आढावा बैठक संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेच्या राज्याच्या महिला अध्यक्षा ॲड.अनिता सुर्यकांत गवळी या देखील उपस्थित होत्या. राज्याच्या उपाध्यक्षा सुरेखा हिरे व राज्याचे उपाध्यक्ष व निरीक्षक उत्तर महाराष्ट्र विभाग मंगल  मोरे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे येत्या काळातील ध्येय व धोरण काय असेल.. यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान हे ग्राहक कायद्याचा इतिहास व कार्यप्रणाली सन्माननीय अध्यक्षांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर समजावून सांगितले व 20 जुलै 2020 चा नवीन आलेला ग्राहक संरक्षण कायदा हा ग्रामीण व शहरात घरोघरी सर्वसामान्य पर्यंत नेण्याचा संकल्प करण्यात आला, ग्राहकांचे हक्क व कर्तव्य समजावून सांगण्यात आले.
        मराठवाडा विभागाच्या नियुक्त्यांमध्ये काही फेरबदल तसेच नवीन संघटनात्मक व जबाबदारीची या कार्यक्रमात दिली गेली.प्रदेश उपाध्यक्षपदी सुरेखा हिरे (रा.नाशिक) , प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक – उत्तर महाराष्ट्र विभाग पदी मंगला मोरे (रा.धुळे) तर अध्यक्ष – धुळे तालुका वैशाली राजेश खैरनार यांची निवड,  उपाध्यक्ष – धुळे जिल्हा शकील पटेल , तर राज्य कार्यकारणी सदस्य सुनिता मुकुंद मांडगे यांची निवड,  तर धुळे शहर – अध्यक्ष स्मिता श्याम खैरनार इत्यादी पदभार महिला विभागाला देण्यात आला .
         पुरुष विभागावर  अध्यक्ष- उत्तर महाराष्ट्र अङॅ. सुरेश रामभाऊ आव्हाड (नाशिक) यांची  तर सल्लागार- नाशिक शहर शेख मुस्ताक गुलाब यांची निवड , तर संघटक-  नाशिक शहर संतोष निवृत्ती धात्रक यांची निवड , तर नाशिक कार्यकारणी- सदस्य मा.सोमनाथ विठ्ठल धात्रक यांची निवड करण्यात आली
अध्यक्ष – अहमदनगर शहर मनपा, धुमाळ प्रताप धनसिंग यांची निवड,  तर धुळे विभागात अध्यक्ष- धुळे शहरावर राजेश अशोक दुसाने यांची निवड,  तर अध्यक्ष – धुळे तालुका संदीप जगन्नाथ ठाकूर यांची निवड,  तर प्रभारी अध्यक्ष – जळगाव ग्रामीण,  मा. प्रज्वल लक्ष्मण चव्हाण यांची निवड,  तर संघटक-  दिंडोरी तालुका अभिषेक शांताराम विधाते,  तर संपर्क प्रमुख- नाशिक (जिल्हा ग्रामीण) सोनू रमेश काठे यांची निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *