थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) येथील आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते आनंद वैराट यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांना हे निवडीचे पत्र शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बेडेकर उपस्थित होते.

       पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य माणसाला समजावून सांगणे व राष्ट्रहिताची विचारधारा डोळ्यासमोर ठेऊन काम करणार असल्याचे आनंद यांनी निवडीनंतर सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *