थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) राज्यातील कोरोना महामारीमुळे सर्व अस्थपणे बंद करण्यात आली होती त्यात शाळा महाविद्यालयांचा समावेश होता जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ शाळा बंद राहिली परंतु गेल्या दोन महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने कमी आल्याने इयत्ता आठवी पासून वर्ग चालू करण्यासाठी परवानगी देण्यात आली परंतु बच्चेकंपनी मात्र या शाळेपासून दूरच होती यावर ‘हवेलीनामा’ ने “सांग सांग भोलानाथ शाळा उघडेल का?” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती त्याला सर्वच स्तरातून खूप प्रतिसाद मिळाला. आज ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत दि १ डिसेंबर पासून राज्यातील सर्व म्हणजे इयत्ता पहिली पासून शाळा चालू होणार असल्याचे जाहीर केले.
लहान मुलं आपल्या आई बाबांपासून दूर जाण्यासाठी कधीच तयार नसतात विशेषतः शाळेत प्रवेश घेतल्यानंतर काही दिवस मुलांची मानसिकता वेगळी असते परंतु त्याला हळूहळू शाळेची ओढ लागते जीवनाच्या प्रत्येक गोष्टीची शिकवण येथे मिळतं असते संस्काराचा धडा गिरवताना अनुभव देखील येथे मिळतात
महामारीत लहान मुलांना अधिक धोका असतो कोरोना काळ तब्बल दीड वर्ष चालू होता त्यामुळे शाळा बंद राहिल्या घरात बसून मुलांना ऊब आली कधी एकदाची शाळा उघडते अस झालं त्यामुळेच की काय ते भोलानाथ कडे शाळा उघडण्याची मागणी करत होते शेवटी आज निर्णय आला आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळू लागला.
