थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावातील ४ आरोग्यकेंद्र हवेलीतील इतर गावात स्थलांतरित करण्यात येणार असून पंचायत समिती हवेलीच्या सभेत तसा प्रस्ताव सभापती संजीवनी कापरे यांनी मांडला तो सर्वानुमते मंजूर झाला आहे यानुसार फुरसुंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर मध्ये स्थलांतरित होईल तर वाघोलीचे केसानंद,खडकवासला येथील अष्टापूर तर देहूचे कदमवाकवस्ती असे स्थलांतर असेल.
पुणे शहराच्या चोहोबाजूंनी वेढलेल्या हवेली तालुक्यातील अनेक गावे शहराचा विस्तार होत असताना महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली त्यामुळे त्यागावच्या नागरी सुविधा महानगर पालिकेकडे वर्ग झाल्या हवेली तालुक्यातील त्याठिकाणी कार्यरत असलेले आरोग्य केंद्र तालुक्यात इतरत्र स्थलांतरीत करण्याची मागणी करण्यात येत होती गावाचे विस्तारीकरण झाल्याने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी असलेल्या आरोग्य केंद्रावर ताण येतो त्यामुळे ही रिक्त झालेली केंद्रे तसेच उपकेंद्रे अन्य गावी स्थलांतर करण्यात येणार आहेत.
या प्रस्तावानुसार कुंजीरवाडी आरोग्य केंद्रात सोरतापवाडी व पेठ तर लोणी काळभोर केंद्रातील कदमवस्ती, कोळपेवस्ती,लोणीस्टेशन,कवडी माळवाडी येथे नवीन उपकेंद्र असणार आहेत
