थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) उरुळी कांचन येथे गेल्या महिन्यात वाळू व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गेल्या वर्षभरात केलेली ही ६० वी कारवाई आहे.
पुणे शहरात संघटित गुन्हेगाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या वर्षभरात अनेक गुन्हेगारावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाईचा धडाका लावला आहे.
लोणी काळभो चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील सोनाई हाँटेल समोर भर दुपारी संतोष जगताप यांच्यावर गोळीबार करून खून करण्यात आला यात एकूण सात जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे यातील महादेव बाळासाहेब आदलिंग हा टोळी प्रमुख असून उमेश सोनवणे याच्या भावाची सन २०११ मध्ये वाळू व्यवसायातून संतोष जगताप याने गोळ्याघालून हत्या केली होती त्याचा बदला घेण्यासाठी उमेश याने अडलिंगे या टोळीचे सहकार्य घेऊन गेल्या महिन्यात संतोष जगताप याच्यावर हल्ला करून खून केला.
या टोळी युद्धाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली त्यामुळे पोलिसांवर याचा छडा लावण्याची मोठी जबाबदारी आली होती परंतु पुणे शहर पोलिसांनी यातील सर्व सदस्यांना गजाआड केले त्यापैकी सहा जण अटकेत असून एक सदस्य त्या गोळीबारात जागीच ठार झाला होता.
यातील महादेव बाळासाहेब आदलिंगे,वय
२८ रा.जुनी तांबेवस्ती,दत्तवाडी,उरूळी कांचन, हवेली,जि.पुणे (टोळी प्रमुख) हा त्याचे साथीदारासह पूर्व भागात गुन्हेगारी टोळी सक्रिय करून त्यांनी आजुबाजूचे भागात शरीरा विरूध्द तसेच मालमत्तेविरूधद्द गुन्हे केले तसेच अवैध मार्गाने पैसा मिळविण्यासाठी आपले गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करून खुन, खुनाचा प्रयत्न, खुनाची सुपारी देणे, अग्निशस्त्रा विक्री विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे दुखापत व हमला करण्याची पुर्व तयारी करून, गृहअतिक्रमण करणे,बेकायदेशीर जमाव जमवुन, दंगा करून दहशत निर्माण करणे अशा स्वरुपाची गुन्हेगारी कृत्ये सातत्याने चालू ठेवलेली आहेत.त्यानंतर महादेव आदलिंगे याने आपले साथीदार १.स्वागत बापु खैरे,वय-२५,रा.उरूळी कांचन, हवेली,पुणे ( मयत-टोळी सदस्य) २. पवन उर्फ प्रशांत गोरख मिसाळ,वय-२९,रा.दत्तवाडी,भवरापु र रोड,उरूळी कांचन, हवेली,पुणे (टोळी सदस्य) ३.उमेश सोपान सोनवणे, वय-३५,रा.मुंपो.राहु,ता.दौण्ड, जि.पुणे (टोळी सदस्य ) ४. अभिजीत अर्जुन यादव,वय-२२,रा.मेडद,ता. बारामती,जि.पुणे (टोळी सदस्य) ५. आकाश उर्फ बाळु जगन्नाथ वाघमोडे,वय-२८,रा.पटेल चौक, कुर्डुवाडी, ता. माढा,जि.सोलापुर (टोळी सदस्य) ६. महेश भाऊसाहेब सोनवणे , वय-२८, रा.भांडवाडी वस्ती,राहु,ता. दौण्ड, जि.पुणे(टोळी सदस्य) यांचे मदतीने आपली दहशत व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी उमेश सोनवणे याच्या भावाचा सन २०११ मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी व अवैद्य वाळु व्यवसाय करण्याचे उद्देशाने
संतोष जगताप यांना पिस्टल मधुन गोळया घालुन जीवे ठार मारले. या आरोपीवर शरीराविरुध्द व मालाविरुध्द पुणे शहर पुणे रेल्वे, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, सोलापुर व उस्मानाबाद जिल्हा असे विविध पोलीस स्टेशनमध्ये एकुण १५ गुन्हे
दाखल असुन,त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांची लोणी काळभोर
परिसरात दहशत असुन त्यांचे दहशती मुळे तक्रार करण्यास कोणाही धजावत नसल्याने त्यांच्या बेकायदेशिर कृत्याना आळा घालण्याकरीता,त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम
सन १९९९ चे कलम ३ (१)(i).३ (२),३(४) चा अंर्तभाव करून मोक्का कायदयान्वये कारवाई होण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांचे मार्फत अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांना सादर केला होता.त्यावर त्यांनी ही कारवाई करण्याची मांजरी दिली.
