थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) गणेश भक्तांमध्ये आंगारक योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असते परंतु हा योग लवकर येत नाही त्यात गेली दीड वर्षे कोरोनाच्या संकटामुळे देवालये दर्शनासाठी बंद करण्यात आली होती कोरोना नंतर आलेली ही अंगारकी चतुर्थी त्यामुळे दर्शनासाठी थेऊरमध्ये मोठी गर्दी झाली होती हजारो भाविकांनी श्री चिंतामणीचे दर्शन घेतले
पुणे शहराच्या जवळ असलेल्या अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर क्षेत्री भाविकांची नेहमीच गर्दी असते परंतु संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या काळात सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवालये दर्शनासाठी खुली केली.कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगात झाल्याने ही लाट जवळपास संपुष्टात आली असे दिसते त्यामुळे नागरिक देवदर्शन पर्यटन स्थळी फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत
आज पहाटे राहुल आगलावे यांनी महापूजा करून मंदिर दर्शनासाठी खुले केले सकाळी भाविकांची गर्दी जास्त होती तर त्यानंतर थोडी कमीजास्त गर्दी चालू होती देवस्थानच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुविधा पुरविण्यात आल्या होत्या परंतु सार्वजनिक स्वच्छता गृहाची गैरसोय मात्र गेली अनेक वर्षांपासून तशीच आहे.हजारो भाविकांना ही सोय पूरविण्यात कमी पडत आहेत गावात अनेक युनिट्स असूनही ते कार्यरत नसल्याने मोठी अडचण होते यावर अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली
मुख्य चौकातून मंदिरापर्यंत च्या सर्व रस्त्यावर दुकानदारांनी अतिक्रमण केले असून यावर ग्रामपंचायत काहीच कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे भाविकांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे दर्शनबारी नेहमीच मंदिराबाहेर येते त्यामुळे दर्शनबारी ची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी भाविक मागणी करतात तसेच चप्पल स्टँडची सोय नसते त्यामुळे अनेक भाविकांची बूट चप्पल चोरीस जातात.
थेऊर फाट्यावरून गावात येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी ग्रामपंचायतीस थोडी रस्त्याची डागडुजी करण्या संदर्भात पत्र दिले होते त्यावर ग्रामपंचायतने मुरुमाने खड्डे भरून घेतले.
कोरोना कमी झाला असला तरीही संपलेला नाही त्यासाठी कोरोना नियम पालने गरजेचे आहे परंतु त्याकडे सर्वच दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते लोणी काळभोर पोलीस बंदोबस्तासाठी होते यात विजय जाधव ,सोनवणे, बनकर, महिला पोलीस दिवसभर लक्ष ठेवून होते.तर व्यवस्थापक डॉ मंगलमूर्ती पोफळे दिवसभर परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते
