थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) बोरी भडक येथील वन विभागाच्या जमिनीत एका तृतीय पंथीयाचा खून झाला होता त्याचा २४ तासाच्या आत उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले असून या प्रकरणी एका तृतीय पंथीयास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामारगावरील यवत पोलीस स्टेशन हद्दीत बोरी भडक येथील वन विभागाच्या जमिनीत दि २१ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने एका तृतीय मकरध्वज बंडेवाड वय२६ वर्षे, रा.कोळवाडी, ता.अहमदपूर जि.लातूर सध्या रा.थेऊर ता हवेली,जि.पुणे याचा खून केल्याचा गुन्हा यवत पोलिसात दाखल झाला होता त्यावर तपास कामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेण्यासाठी थेऊरफाटा ते सहजपुर फाटा दरम्यानचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता खून झालेल्या मकरध्वज बांडेवाड सोबत आणखी एक जण असल्याचे दिसून आले त्यावर पोलीस तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी सखोल माहिती मिळवली की त्याच्यासोबत असलेली व्यक्ती त्याचा तृतीयपंथी सहकारी काजल चव्हाण असल्याची माहिती मिळाल्याने त्यास थेऊर येथून
ताब्यात घेऊन चौकशी केली सुरुवातीला काजल चव्हाण याने उडवा – उडवीची उत्तरे देऊ
लागला परंतु त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता तो खून काजल उर्फ केशव उमाजी चव्हाण, वय २६ वर्षे, रा. रुई धानोरा ता. गेवराई, जि.बीड सध्या रा.थेऊर, ता.हवेली, जि.पुणे याने केल्याचे मान्य केले.
ही उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक नारायण पवार, सपोनि केशव वाबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, सचिन काळे, संदीप येळे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, गणेश करचे, राजीव शिंदे, संदीप देवकर,पोलीस नाईक महेंद्र चांदणे, रामदास जगताप,मेघराज जगताप,निखिल रणदिवे,पोलीस शिपाई सोमनाथ सुपेकर,.मारुती बाराते, किरण तुपे यांचे पथकाने केली आहे.
