किरण खुडे
   राजगुरुनगर  (हवेेेलीनामा ऑनलाईन) खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील डेहणे येथे हॉटेलच्या काचा फोडून हप्ता पहिजे म्हणून हॉटेल मालकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत परस्परविरोधी तक्रारी होऊन चेोघांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेहणे येथील हॉटेल मालक शंकर दत्तात्रय कोरडे (रा. डेहणे, ता.खेड ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची पत्नी व आचारी आणि भाऊ जगदिश सतुभाऊ कोरडे असे हॉटेलमध्ये काम करत होते. कोरडे हे हॉटेललगत असणाऱ्या घरी होते. दरम्यान, अचानक हॉटेलच्या फर्णिचरच्या काचा फुटण्याचा आवाज आल्याने ते पळत हॉटेलमध्ये आले. त्यावेळी हॉटेलमध्ये आकाश हुरसाळे व त्याच्या सोबत इतर तीन तरुण होते. त्यांच्या हातात कोयते होते. आकाश हुरसाळे याला त्यानी विचारले आमच्या हॉटेलच्या नुकसान का करतो ? यावर मला तू हप्ता का देत नाही असे म्हणून चिडून आकाश हुरसाळे याने हातातील कोयत्याने तसेच त्याच्या सोबत असलेल्या तरुणाने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन जखमी केले.
तर दुसऱ्या फिर्यादीत रोशन अरुण परड (वय १७, रा.मंदोशी, ता.खेड ) याने म्हटले आहे की, मी व मित्र मनिष आंबेकर, निकेतन जाधव, असे तिघेजण शंकर कोरडे यांच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलो होतो. आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो तेव्हा फीर्यादीच्या ओळखीचे समिर कोरडे, नामदेव कोरडे, शंकर कोरडे (सर्व रा. डेहणे, ता.खेड ) हे हॉटेलमध्ये दारु पित बसले होते. ते आमच्याकडे पाहून शिवीगाळ करत होते. म्हणुन फिर्यादीने विचारले तुम्ही शिव्या कोणाला देता? यादरम्यान बाचाबाची झाली. नामदेव कोरडे हे हॉटेलमधून बाहेर जाऊन पुन्हा हॉटेलमध्ये तीन कोयते घेऊन आले. नामदेव कोरडे यांनी त्यांच्या हातातील कोयते शंकर कोरडे, समिर कोरडे यांच्याकडे प्रत्येकी एक दिला व ते आमचे जवळ येवुन आम्हास मारहाण करु लागले. मला नामदेव कोरडे यांनी पाठीत कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. त्यावेळी सोबत असलेले फिर्यादीचे मित्र मनिष आंबेकर व निकेतन जाधव हे मारहाणीच्या भितीने पळून गेले. नामदेव कोरडे, शंकर कोरडे व समिर कोरडे यांनीही रोशन परड याला लाथाबुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास खेडचे पोलीस निरीक्षक सतिश गुरव करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *