थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाची विद्यार्थिनी शेहनाज शेख हिने नुकत्याच झालेल्या मिस इंडिया आयकॉन २०२१ या स्पर्धेत विजेतेपद पटकावले.तिने सप्टेंबर महिन्यात मिस पुणे एलिट- E3 चे विजेतेपद पटकावले होते. मिस इंडिया आयकॉन -२१ सह मिस बॉडी ब्युटीफुल या स्पर्धेमध्ये सुद्धा विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेचे आयोजन नाइट्स रेकॉर्ड आणि टीन टियारा क्वीन, संस्थापक मनिंदर सिंग यांनी केले होते.अंतिम फेरी हरियाणातील अंबाला येथे झाली. महाअंतिम फेरीत परिचय, प्रतिभा आणि प्रश्नोत्तर फेरी अशा तीन फेऱ्यांचा समावेश होता. या स्पर्धेत एकूण ३०० स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि केवळ ६० स्पर्धकांनी महाअंतिम फेरीत प्रवेश केला होता त्यामध्ये परिचय आणि वैयक्तिक प्रश्नोत्तरांच्या फेरीनंतर टॉप ३० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. शेवटी, एक समान प्रश्न आणि उत्तर फेरी होती. सुश्री शेख यांनी सर्व फेऱ्या पार केल्या आणि मिस इंडिया आयकॉन २१ आणि मिस बॉडी ब्युटीफुल विजेती ठरली.
         या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, स्कूल ऑफ ह्युमॅनिटीजच्या अधिष्ठाता डॉ. आसावरी भावे, स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अतुल पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी यांनी सेहनाज शेखनी हिचे अभिनंदन करत पुढच्या वाढचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *